Posts

Showing posts with the label गौतमी पाटील

गौतमी पाटील पुन्हा साताऱ्यात, लावणीचं निमित्त ऐकून होणार थक्क...

Image
 आख्य्या महाराष्ट्राला गौतमी पाटील हिने तिच्या डान्सने वेड लावलं आहे. तिच्या अनेक कार्यक्रमात तरुणाईचा गोंधळ झालेला पाहायला मिळत असून गौतमी पाटील संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाली आहे. सातारा : महाराष्ट्रातील कोणत्याही तरुणाला गौतमी पाटील ( Gautami Patil ) नाव माहिती नसेल असा तरुण शोधून सापडणार नाही. संपूर्ण तरुणाईला परिचित असलेल्या गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला दिवसेंदिवस मागणी वाढत चालली आहे. गौतमी पाटील हीचे जवळपास महिनाभर बुकिंग वेटिंगवर आहे. त्यामुळे गौतमी पाटील हिची क्रेझ संपूर्ण महाराष्ट्रात असून सर्वांनाच गौतमी पाटील हिने वेड लावलं आहे. आज पुन्हा गौतमी पाटील ही साताऱ्यात थिराकणार आहे. पंधरा दिवसांपूर्वी पाच वर्षाच्या मुलाच्या वाढदिवसाला खोजेवाडी येथे गौतमी पाटीलचा लावणीचा कार्यक्रम पार पडला होता. आता पुन्हा एकदा वाढदिवसाला गौतमी पाटील साताऱ्यात हजेरी लावणार आहे. पण तो वाढदिवस खास असल्याने त्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. आपल्याकडे मराठीत म्हणतात हौसेला मोल नसतं, अगदी तसंच काहीसे आज साताऱ्यात घडतंय. एका बैलगाडा मालकाने आपल्या बैलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटील हिचा लावणीचा ...